चालू असलेला शोध कार्यक्रम

भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाकडे २० डायमंड कोर ड्रिल मशिन्स आहेत. सध्या संचालनालय कोळसा, सिलिमेनाइट-पायरोफिलाइट, बॉक्साईट आणि लोह धातू यांच्या शोधकार्याबरोबरच सामान्य सर्वेक्षण योजना राबवत आहे.

क्षेत्रीय हंगाम २०१४-१५ मध्ये राज्यातील पुढील भागांमध्ये खनिज अन्वेषणाचे काम सुरू आहे.

अनुक्रमांकखनिजक्षेत्राचे नावजिल्हे
1कोळसानांद - पांजरेपारनागपूर
कोळसादावा - फुकेश्वरनागपूर
कोळसाअष्टोना - कोथुर्णा - मंगळी; अडकळी - खडकडोहयवतमाळ
कोळसाविस्लोनचंद्रपूर
कोळसानांदोरी, नांदोरी (दक्षिण)चंद्रपूर
कोळसाचालबार्डीचंद्रपूर
कोळसाटाकळी आणि पानवडाळाचंद्रपूर
2सिलिमेनाइट-पायरोफिलाइटवाळी - खातगावचंद्रपूर
3सामान्य बॉक्साईट सर्वेक्षणगुहागर तालुकारत्नागिरी
4सामान्य बांधकाम खनिज सर्वेक्षणखुलताबाद तालुकाऔरंगाबाद
5लोह धातूलोहराचंद्रपूर