उद्दिष्ट्ये

विभागाची मुख्य उद्दिष्टे हि खनिज साठ्यांचा शोध, शोधमोहीम (prospecting), आणि शिस्तबद्ध विकास, तसेच खनिज प्रशासन — ज्यामध्ये खाण पट्टे मंजुरी, महसूल व डेड रेंट वसुली, आणि पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध खाणकाम सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे अशी आहेत.

खनिज प्रशासन: 

खनिज संसाधनांचे व्यवस्थापन खाण पट्टे मंजुरी, महसूल वसुली, आणि पर्यावरणीय जबाबदारीने खाणकार्याच्या अंमलबजावणीद्वारे केले जाते. 

अन्वेषण: 

राज्यातील खनिज संपत्तीच्या जलद व कार्यक्षम अन्वेषणासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित केला जातो. 

महसूल वाढ: 

खनिज उत्पादन वाढवून आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून विकास घडवून आणून राज्याचा महसूल वाढविणे. 

संशोधन व विकास (R&D):

खनिज ओळख, विश्लेषण, अन्वेषण यामधील संशोधन व विकासास प्रोत्साहन देणे. यामध्ये खनिज संवर्धन, कचऱ्याचा उपयोग, आणि निम्न-गुणवत्तेच्या खनिजांचे मूल्यवर्धन यावर विशेष भर दिला जातो.